मुंबई

समाज माध्यमांवर करडी नजर

CD

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी नेते-कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांचाही वापर केला जात आहे. मात्र, आचारसंहितेचा भंग आणि आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केल्यास संबंधित ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यासाठी सायबर सेलकडून त्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक काम करत आहे. ग्रुप ॲडमिनसह समाज माध्यमांवर वावरणाऱ्यांनी यापुढे सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होते आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. या माध्यमांवर मोठ्या खुबीने प्रचार केला जात आहे. परंतु, आचारसंहितेचा भंग व आक्षेपार्ह पोस्ट या माध्यमांद्वारे व्हायरल केला जाऊ शकतो. यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या विशेष पथकाकडून त्यावर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासाठी सायबर सेलमध्ये स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकाकडून सर्विंग करून राजकीय स्वरूपाच्या संदेशांवर करडी नजर ठेवली जात आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी व नागरिकांमार्फत संदेश, पोस्टर व्हायरल केले जाऊ शकतात. त्यावर पोलिसांची करडी नजर आहे. निवडणूक आयोगाने समाज माध्यमांसाठी तर नियमावली जारी केली आहे. जेेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्यामुळे याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आक्षेपार्ह संदेश वा पोस्ट व्हायरल केल्यास या संदर्भात शहर, ग्रामीण सायबर पोलिसांकडून ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा या वेळी दिला आहे.

सावधानता बाळगा
समाज माध्यमांसाठीही आचारसंहिता लागू असल्याने कुणीही आक्षेपार्ह, बदनामीकारक संदेश पोस्ट व्हायरल करू नये. समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठीच करा. आक्षेपार्ह संदेश व्हायरल न करता पोलिसांना कळवा. समाजमनात तेढ निर्माण होईल, असे असे संदेश टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक काळात समाज माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. आचारसंहितेचा भंग व आक्षेपाई संदेश व्हायरल होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. अन्यथा, संबंधितांविरोधात सायबर कलमान्वये कारवाई केली जाईल.
- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT