मुंबई

गायी चोरल्याच्या संशयावरून फिरस्त्याची हत्या

CD

गायी चोरल्याच्या संशयावरून एकाची हत्या
पिता-पुत्रांना अटक; मदत करणाऱ्या रिक्षाचालकावरही गुन्हा
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : गायी चोरल्याच्या संशयावरून तुर्भे एमआयडीसीतील तबेला चालक पिता-पुत्राने एका फिरस्ता व्यक्तीला तबेल्यात आणून पाच तास प्रचंड मारहाण केली. त्या मारहाणीमुळेच त्या व्यक्तीचा मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तबेलाचालक पिता-पुत्रासह त्यांना या कामात मदत करणाऱ्या रिक्षाचालकालाही अटक केली आहे.
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव ठाकूर (वय ४५) असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. फिरस्ता असलेला ठाकूर हा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे त्याला ठाकूर म्हणूनच त्याची सर्वत्र ओळख होती. सहा ते सात महिन्यांपूर्वी ठाकूर हा तुर्भे एमआयडीसीतील महात्मा गांधीनगर झोपडपट्टीत राहत असताना त्याने आरोपी उमाशंकर गौड याच्या तबेल्यातून तीन गायी चोरून त्यांची परस्पर विक्री केली होती.
गायी चोरल्याप्रकरणाची माहिती विचारण्यासाठी तबेलाचालक उमाशंकर आणि त्याचा मुलगा जयप्रकाश गौड हे दोघेही मंगळवारी महापे एमआयडीसीतील अडवली-भुतीवलीमधील पारधी वस्तीत गेले. त्यानंतर त्यांनी ठाकूरला जबरदस्तीने नागेश इंगळे याच्या रिक्षात बसवून तुर्भे महात्मा गांधीनगरमधील तबेल्यात घेऊन आले. त्याठिकाणी फिरस्त्याला पिता-पुत्रांनी वेगवेगळ्या हत्याराने तब्बल पाच तास बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी ठाकूरला त्यांनी पारधी वस्तीत आणून टाकले. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पिता-पुत्रांना अटक करून रिक्षाचालक नागेश इंगळे यालाही अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT