मुंबई

महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच भिवंडी शहराचा चेहरामोहरा कपिल पाटील यांनी बदलला आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी (ता. १४) येथे व्यक्त केला. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भिवंडीतील धामणकर नाका येथे नुक्कड सभा घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. भिवंडी शहर हे श्रमजीवींचे शहर आहे. भाजपचे कपिल पाटील हे २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेल्या योजना शहरातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात बदल होत आहे. किंबहुना भिवंडीचाही कायापालट होत असल्याचा आनंद वाघ यांनी व्यक्त केला. दरम्यान, भिवंडी शहरातील विविध भागाला भेट देत वाघ यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूकप्रमुख संतोष शेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, उद्योगपती हितेश मारू, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुनीता टावरे, ममता परमाणी, सुगंधा टावरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय काबुकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT