मुंबई

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मागील दोन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातवरणात गारवा निर्माण झाला होता; मात्र बुधवारी (ता.१५) तापमानाचा पारा ४०.६ अंशांवर गेल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. त्यामुळे नागरिकांची पावले शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागली होती.

एप्रिलमध्ये ठाणे शहरातील उष्णतेचा पारा ४१.६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर उष्णतेचा पारा हा ३५ ते ४० अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. अशातच सोमवारी (ता. १३) सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सुमारे दीड ते दोन तास कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता; मात्र, त्यानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी वातावरणात पुन्हा उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. बुधवारी ४०.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले होते. या वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांनी डोक्यात टोपी, तर काहींनी छत्री घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी थंड पेयाच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

"म्हणून आम्ही मुलाचा विचार केला नाही" राकेशने केला मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबाबतचा खुलासा

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT