मुंबई

जमिनीच्या वादातून भावाला सळईने मारहाण

CD

जमिनीच्या वादातून भावाला सळईने मारहाण
रोहा, ता. १५ (बातमीदार) : सामाईक जमिनीतील माती काढू देत नसल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा भावांमधील वाद उफाळून आला. त्यामुळे जमिनीच्या वादावरून ७० वर्षीय वृद्ध भावाला लोखंडी सळई व लाठी-काठीने जबर मारहाण केल्याची घटना रोहे तालुक्यातील कोलाड भागातील वाळंजवाडी येथे घडली आहे.
या प्रकरणी मारुती पांडुरंग वाळंज (वय ७०, रा. वाळंजवाडी, ता. रोहा) असे तक्रार दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून कोलाडकडे जात असताना वाळंजवाडी बस स्टॉपजवळ आले होते. त्यावेळी आरोपी व त्यांचा सख्खा भाऊ सीताराम पांडुरंग वाळंज याने शेतातील माती काढण्यावरून वाद घातला. यावेळी सीताराम पांडुरंग वाळंज, यशवंत सीताराम वाळंज, हेमंत सीताराम वाळंज यांनी संगनमताने मारुती वाळंज यांना लाठीकाठीने मारहाण करून लोखंडी सळईने डोक्यावर हल्ला केला. यामध्ये मारुती वाळंज गंभीर जखमी असून वाद सोडवायला गेलेल्यांनाही मारहाण केली आहे. याप्रकरणी कोलाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT