मुंबई

अनुज थापनच्या आत्महत्येप्रकरणी तपास अहवाल सादर करा

CD

अनुज थापनच्या कथित आत्महत्येप्रकरणी तपास अहवाल सादर करा
- उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केली. मात्र, अनुज याचा मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत अनुजच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्‍या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे सीसी टीव्ही फुटेज आणि पोलिस अधिकाऱ्यांचे कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) जपून ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही दिवसांपूर्वी दोन जणांनी गोळीबार केला होता. दोन आरोपींना गुजरातमधील भूज येथून अटक करण्यात आली; तर अनुज थापन आणि सोनू बिश्नोई याला पंजाबमधून अटक केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अनुजने तुरुंगात चादरीच्या साह्याने गळफास लावून घेतला.
सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज (ता. १५) सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, कायद्यानुसार या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) देखील दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास ३ मे रोजी सीआयडीकडे वर्ग केला आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी २२ मे पर्यंत तहकूब केली.

सीबीआय चौकशीची मागणी
शवविच्छेदन अहवालात गळ्याभोवती चादर गुंडाळल्याने झालेले व्रण व श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Latest Marathi News Live Update : सोनाराला फसवून 30 ग्रॅम सोनं चोरलं

SCROLL FOR NEXT