मुंबई

बालकाकडून करून घेतले शरीरसंबंधाचे चित्रीकरण

CD

बालकाकडून करून घेतले शरीरसंबंधाचे चित्रीकरण
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; महिलेच्या प्रियकराचे कृत्य

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : उरण भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सहा वर्षीय लहान मुलाकडून प्रियकरासोबत शरीरसंबंध करतानाचे मोबाईलवर चित्रीकरण करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता उरण पोलिसांत महिला व तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तिच्या प्रियकराविरोधात पोक्सो अंतर्गत मंगळवारी (ता. १४) गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ लहान मुलाकडून करून घेऊन बाल मनावर त्याचे वाईट परिणाम होतील असे गैरकृत्य केल्याने दोघांवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला व तिच्या प्रियकरामध्ये मागील तीन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच महिलेच्या पतीला ही गोष्ट समजल्यानंतर पतीने महिलेला सोडून दिले. त्यानंतर ही महिला उरणमध्येच राहत होती. मात्र गेल्या महिन्यामध्ये तिच्या प्रियकरासोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले होते. हा वाद पोलिसांत गेल्यानंतर प्रियकराविरोधात बलात्कार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली होती.
प्रियकराला अटक केल्यानंतर जामीन मिळवण्यासाठी त्याने पनवेल सत्र न्यायालयात या महिलेसोबत आपले तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच या त्यांच्या प्रेमसंबंधाचा पुरावा म्हणून त्याने त्यांच्यातील शरीरसंबंधाचाही व्हिडीओही न्यायालयात सादर केला. संबंधित व्हिडीओची न्यायालयाकडून चौकशी केली असता तो व्हिडीओ महिलेच्या सहा वर्षीय लहान मुलानेच केल्याचे प्रियकराने कबूल केले.
या प्रकरणाची न्यायालयाकडून गंभीर दखल घेत लहान मुलाला शरीरसंबंधाचे चित्रीकरण करण्यास सांगून त्याच्या बालमनावर वाईट परिणाम होईल असे गैरकृत्य करून मुलाची लैंगिक छळ केल्याचे आढळून आल्याने महिला व प्रियकराविरोधात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उरण पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या दोघांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT