Mumbai Loksabh  sakal
मुंबई

Mumbai Loksabha: गृहनिर्माण चळवळीला फडणवीसांनी गती दिली, दरेकरांनी केले कौतूक

CD

Mumbai News: राज्यातील गृहनिर्माण आणि सहकार चळवळीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गती दिली असल्याचे मत भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (ता. १६) व्यक्त केले. ते सहकारी संस्थांच्या मेळाव्यात बोलत होते.

उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांच्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील गृहनिर्माण आणि सहकार चळवळीला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिली आहे.

मुंबईतील ९५ टक्के मतदान हे गृहनिर्माण सोसायट्यांमधून होते. सर्वांचाच सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंध येतो, त्यामुळे त्यांच्या मताला किंमत आहे. या संस्थांचे पदाधिकारी सगळ्यांची काळजी घेतात, त्यांच्यामुळे त्यांना आम्ही या मेळाव्यास बोलावले आहे. पंतप्रधानांनी देशाचा नावलौकिक जगाच्या पाठीवर उंचावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेली ६०-६५ वर्षे काँग्रेसने कधीही सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला नाही. तो निर्णय २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. अमित शहा यांनी सहकार मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्वात आधी देशभरातील सगळ्या संस्थांचे संगणकीयकरण केल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे मत त्यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT