मुंबई

मतदान केंद्रावर पंख्याऐवजी मिळाला कुलर

CD

अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यात निवडणुकांचा फिव्हरही सुरू होता. मुंबईसह ठाण्यात सोमवारी मतदान होणार असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदल्या दिवशीच केंद्रांवर रवाना केले होते. मात्र, अंबरनाथ शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी केंद्रावर पोहचताच असुविधा दिसून आल्या. मतदान केंद्रावर पंखे आणि किमान सोयी नसल्याने त्यांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची तत्काळ दखल घेत पंख्याऐवजी कुलर पाठवण्यात आले. याशिवाय, इतर सुविधा पुरवल्याने मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शिवाजीनगर परिसरातील जिजामाता विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर पंखा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी यांसारख्या मुलभूत सोईंचा अभाव केंद्रप्रमुख किरण घरत यांना आढळून आला होता. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असताना आणि अशा गैरसोई असलेल्या ठिकाणी सोमवारी निवडणुकीच्या जबाबदारीचे काम करणार कसे, असा पेच निर्माण झाला होता. घरत यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून मतदान केंद्रातील गैरसोईंबाबत माहिती दिली. त्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबरनाथ तहसीलदार प्रशांती माने यांच्याशी संपर्क साधला, तहसीलदार माने यांनी याप्रकरणी त्वरेने दखल घेतली. अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजित पराडकर यांच्याशी संपर्क साधून मतदान केंद्राची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. पराडकर यांनी पालिका अधिकारी विशाल राठोड यांचे पथक जिजामाता शाळेतील मतदार केंद्राकडे पाठवले. त्यानंतर उपअभियंता राजेश तडवी यांनी रविवारी सायंकाळपर्यंत केंद्रावर कुलरची सोय केली. तसेच, अन्य गैरसोय होऊ नये, यासाठी एका फ्लॅटमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या. केंद्रात कुलर लावण्यासाठी नवीन बोर्ड बसवला. निवडणूक यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध झाल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.


मतदान केंद्रावर दोन पोलिस कर्मचाऱ्यासह १० ते १२ जण निवडणूक कामगिरीवर होते. त्यात काही महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तहसीलदार प्रशांती माने, अतिरिक्त मुख्याधिकारी पराडकर यांनी उत्तम सहकार्य केल्याने सोमवारी काम करताना समाधान वाटले.
- किरण घरत, मतदान केंद्रप्रमुख, अंबरनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT