मुंबई

अकिंचन महाराज यांचे मुलुंडमध्ये आगमन

CD

मुलुंड (बातमीदार) : श्री कृष्ण चैतन्य मिशनचे प्रमुख, जगन्नाथ धाम, पुरीचे भक्ती विज्ञान स्वामी अकिंचन महाराज यांचे मुलुंड येथे आगमन झाले आहे. मुलुंड उत्कल संस्था आणि युथ ब्रिगेड असोसिएशनच्या वतीने केशव पाडा, मुलुंड पश्चिम येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबूलाल सिंग, मुलुंड उत्कल संस्थेचे अध्यक्ष हरिहर साहू, सरचिटणीस पीतांबर साहू, मोहन पाडी, युवा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन सिंग, समाजसेवक सुशील सालियन, मनोहर घोलप यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
.....
साकीनाका येथे कचऱ्याचे ढीग
घाटकोपर (बातमीदार) : साकीनाका परिसरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील नाल्यांची सफाई न केल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साकीनाका मेट्रो स्टेशनखाली घाटकोपर लिंक रोडवरील मोठ्या नाल्यातील कचरा रस्त्यावर साचला आहे. हा कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावरील कचरा पुन्हा नाल्यात जात आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. येथील दुकानदार प्रेमचंद यांनी सांगितले की, रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुकानदार आणि रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. चांदिवली, तुंगा गाव, संघर्ष नगर, खैराणी रोड, सफेदपूल या भागातील मोठ्या नाल्यांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांदिवली तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांनी महापालिकेच्या एल वॉर्डच्या स्वच्छता विभागाकडे केली आहे.
....
लोकलमध्ये चक्कर येऊन पडलेल्या मुलीचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण
घाटकोपर (बातमीदार) : मुंबईत एकटीच राहत असलेली आणि कायद्याचा अभ्यास करणारी एका विद्यार्थिनी परीक्षेला जाताना लोकलमध्ये चक्कर येऊन पडली. ही माहिती कळताच वांद्रे रेल्वे पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन तिच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर तिने दिलेल्या माहितीच्या आधारे वडाळा येथील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले. पोलिसांच्या या मदतीमुळे तिचे प्राण वाचले आहेत. ही घटना १५ मे रोजीची असून, सोफिया कुरेशी असे तिचे नाव आहे. महिला सुरक्षा पथकअंतर्गत (गुन्हे शाखा) पोलिसांनी लोकलमध्ये चक्कर येऊन बेशुद्ध झालेल्या मुलीचा जीव वाचवून तिचा पेपर असल्याने कॉलेजमध्ये तिला प्राचार्यांच्या ताब्यात देण्यात आले.
...…
वाहतूक पोलिसांकडून ४१ लाखांचा दंड वसूल
मुलुंड (बातमीदार) : मुलुंड वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. भांडुपच्या एस वॉर्डपासून मुलुंड चेकनाक्यापर्यंत वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. याबाबत मुलुंड वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१,४८८ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. मुलुंड वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागांत ६० पोलिस कर्मचारी यासाठी तैनात केले आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाकडून दंड शुल्क आकारले जात आहे. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जात आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक) अजित सुळे यांनी सांगितले.
…..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT