मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृताची संख्या १८वर

CD

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या १८वर
जखमी राजू सोनवणे यांचा केईएममध्ये उपचारादरम्यान मृत्यू
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) : रेल्वे पोलिस वसाहत येथे गेल्या सोमवारी (ता. १३) पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा रविवारी (ता. १९) रात्री १२ वाजता मृत्यू झाला. राजू सोनवणे असे मृताचे नाव असून ते घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात राहत होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.

होर्डिंग दुर्घटनेतील पाच जखमींसह सोनवणे हे के.ई.एम. रुग्णालयात उपचार घेत होते. १३ मे रोजी घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला; तर ७५ जण जखमी झाले होते. जथमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका जखमीचा आता मृत्यू झाल्याने दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर गेली आहे. राजू मारुती सोनावणे हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची पत्नी हाऊसकीपिंगचे काम करत असून, मुलाला नोकरी नाही. त्यातच कर्ज काढून त्यांनी बदलापूर येथे घर घेतल्याची माहिती त्यांचे नातेवाईक अश्र्वजित सोनवणे यांनी दिली. या होर्डिंग दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या रेल्वे, पालिका अधिकारी आणि तक्रारी देऊनही या धोकादायक होर्डिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी अश्र्वजित सोनवणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT