मुंबई

अवघ्या चार कंपन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मुंबईत महाकाय होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेनंतर ठाणे पालिका प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. मागील आठवड्यात बुधवारी (ता. १५) होर्डिंगमालकांची (जाहिरातदारांची) बैठक घेत येत्या आठ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेने दिले होते. त्यानुसार गेल्या सहा दिवसांत २९४ पैकी ५० होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल अवघ्या ४ कंपन्यांनी सादर केल्याची बाब समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने मुंबई घाटकोपर येथील मोठे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह ठाणे महापालिकादेखील अलर्ट मोडवर आली आहे. या घटनेनंतर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक घेत ज्या जाहिरादारांनी मोठ्या आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात जाहिरात फलकांचे लहान-मोठे असे २९४ लोखंडी सांगाडे आहेत. त्यांनी ते आठ दिवसांच्या आत नियमानुसार जाहिरात फलक बसवावेत; अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या आदेशानंतर सहा दिवसांच्या कालावधीत २९४ पैकी ५० जाहिरात होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल चार कंपन्यांनी पालिकेकडे सादर केला आहे. उर्वरित होर्डिंगचा अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अजून किती होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठेकेदाराला जाहिरात हक्क
ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी उद्यान सुशोभीकरणाअंतर्गत ठेकेदाराला जाहिरात हक्क देण्यात आला आहे. त्यातून ठेकेदाराने जाहिरात फलक उभारलेले आहेत. शौचालय उभारणीच्या बदल्यात ठेकेदारांनी जाहिरात फलक उभारले आहेत. याशिवाय, शहरात बेकायदा जाहिरात फलकही उभारलेले आहेत.

कळव्यात कारवाई कधी?
ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले. त्यानुसार सहायक आयुक्तांनी सर्वेक्षण सुरू केले. या वेळी चिखलवाडी येथील जाहिरात फलक कंपनीने काढून टाकला आहे. असे असले तरी कळवा नाक्यावरील बेकायदा जाहिरात फलकावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यानंतरच पालिका कारवाई करणार का, असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT