‘म्हाडा’कडून अर्ज करण्यास मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,४९५ सदनिका व भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेकरिता अर्जदारांच्या मागणीमुळे २६ मे, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संभाजीनगर मंडळातर्फे २८ फेब्रुवारी रोजी ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये अतिरिक्त १९३ सदनिका व गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले. तसेच अर्जदारांना अर्ज सादर करून सोडतीत सहभाग घेण्याकरिता २० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. सदरची मुदत संपल्याने म्हाडाने अर्ज भरण्याच्या अंतिम मुदती २६ मे पर्यंत वाढवली आहे. तसेच अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पेमेंटद्वारे दिनांक २६ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करू शकतील. त्याचबरोबर आरटीजीएस, एनईएफटीद्वारे २७ मे पर्यंत बँकेत अनामत रक्कम भरता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.