मुंबई

घाटकोपर, मुलुंडमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद

CD

घाटकोपर, मुलुंडमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यातील जलवाहिनी वळविण्याचे काम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रापर्यंत गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत अस्तित्वात असलेली १,२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २४ ते २५ मेदरम्यान २४ तासांसाठी घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेतर्फे दोन ठिकाणी १,२०० मिलीमीटर बाय १,२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपासून शनिवार, २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत (एकूण २४ तासांसाठी) गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड पश्चिम येथे हाती घेण्यात येणार आहे. ही जलवाहिनी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या आड येत असल्याने ती वळविणे गरजेचे आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे.


नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व), टागोर नगर, कन्नमवार नगर विक्रोळी, मुलुंड-गोरेगाव जोडरस्त्यालगतचा परिसर, सीएट टायर मार्गलगतचा परिसर, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल-मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्गलगतचा परिसर तर घाटकोपरमधील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय आदी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


--
मुलुंड परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुलुंड-गोरेगाव जोडरस्त्यालगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव इत्यादी भागात २४ तासांसाठी २४ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT