मुंबई

चुकीच्या व्यवस्थापनामुळे ‘कोंडी ’

CD

चुकीच्या व्यवस्थापनामुळे ‘कोंडी’

गोखले पुलामुळे बिसलेरी जंक्शनवर वाहतूक ठप्प; वाहनचालक संतप्त     


सकाळ वृत्तसेवा
 मुंबई, ता. २९ : अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलावरील वाहतूक व्यवस्थापन योग्य रीतीने केले जात नसून त्यामुळे  बिसलेरी जंक्शनवर वाहतूक ठप्प होत आहे. त्याबाबत वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. गोखले पुलावर वाहतूक नियोजन चुकीच्या पद्धतीने केले जात असून त्याच्या परिणामी पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी योग्य प्रकारे व्यवस्थापन करून ही कोंडी फोडावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.  
गोखले पुलाची एक मार्गिका नुकतीच सुरू झाली; परंतु यामुळे अंधेरीतील वाहतूक कोंडीवर फारसा फरक पडलेला नाही. मिलन सबवे वगळता इतर भागातील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. अंधेरीत एस. व्ही. रोडसह लिंक रोडवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता अंधेरी पश्चिम येथील वर्सेवा, चार बंगला, सात बंगला, यारी रोड, डी. एन. नगर, स्वामी समर्थ नगर, जुहू आदी परिसरातून पश्चिम द्रुतगतीमार्गे बोरिवली व दक्षिण मुंबईत जाण्यासाठी गोखले पूल हा सर्वात जवळचा मार्ग ठरतो. त्यामुळे या पुलावरून दररोज किमान ६ ते ८ हजार वाहनांची ये-जा होते. बसगाड्यांसह रिक्षा, टॅक्सी आणि मोठ्या वाहनांसाठीही हा मार्ग सोयीचा आहे; परंतु  गोखले उड्डाणपूल बंद झाल्यानंतर जुहू आणि विलेपार्ले भागात वाहतूक कोंडीचा सामना आजही करावा लागत आहे.


गोखले उड्डाणपुलावर सिग्नल ओलांडण्यासाठी  १२० मिनिटे लागत आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे.
-  संजय पांडे, वाहनचालक

गोखले उड्डाणपुलावरून प्रवास करणे खूप त्त्रासादायक आहे. योग्य रीतीने वाहतूक व्यवस्थापन आणि सिग्नल वेळ व्यवस्थापन न केल्याने सतत वाहतूककोंडी होत आहे.
-  विनोद मुळे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT