crime news  sakal
मुंबई

Crime News: मालाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

CD

Mumbai Crime: तीन दिवसांपूर्वी मालाड येथे झालेल्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश मालाड पोलिसांनी केला. याप्रकरणी पळून गेलेल्या वैजू महादेव मुखिया (४५) या आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली.

त्यानेच शांताबाई सीताराम कुऱ्हाडे या ८९ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालाड येथील सक्सेरिया कंपाऊंडजवळील चिचोंली विठ्ठलपाडा सुभाष डे चाळीत शांताबाई राहत होत्या. त्या भीक मागून उदरनिर्वाह चालवत असत. शुक्रवारी तिचा मृतदेह राहत्या घरात सापडला होता. याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात महिलेच्या बरगडीसह डोक्याला मार लागल्याचे दिसून आले.

तिचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे शांताबाईचा नातू राजेश शिंदे याच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT