Crime News  sakal
मुंबई

Crime News : जीम ट्रेनरवर एका स्थानिकाने केला चाकू हल्ला, वाचा काय आहे प्रकरण?

गोल्डन पार्क येथील ‘फिटनेस प्रोफेसी’ येथे जीम प्रशिक्षक म्हणून कामाला आहे|Working as a gym trainer at 'Fitness Prophecy' in Golden Park

सकाळ वृत्तसेवा

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा भागात रविवारी (ता. १९) रात्री पंकज गुप्ता (३४) या जीम ट्रेनरवर एका स्थानिकाने चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्‍याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (maharashtra news)


किराणा दुकानातील उधारी, पोलिस ठाण्यात तक्रार केल्‍याच्या रागातून हल्ला झाल्‍याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले. पंकज गुप्ता हा काळा तलाव भागात ठाणकारपाडा येथे कुटुंबीयांसमवेत राहतात. गोल्डन पार्क येथील ‘फिटनेस प्रोफेसी’ येथे जीम प्रशिक्षक म्हणून कामाला आहे. (marathi news)

पंकजचा भाऊ नितेश याचे काळा तलाव भागात साई किराणा दुकान आहे. या दुकानातून ठाणकरपाडा भागातील राकेश गणेश पवार (३०) हा उधारीने किराणा सामान नेतो. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे राकेश उधारीने किराणा सामान नेण्यासाठी आला. नितेशने त्याच्याकडे यापूर्वी नेलेल्या किराणा सामानाचे पैसे दे, मग सामान घेऊन जा, असे सांगितले. त्याचा राकेशला राग आला. त्याने शिवीगाळ करत नितेशला बेदम मारहाण केली. नितेशने बाजारपेठ पोलिस ठाण्यात राकेशविरुद्ध तक्रार केली. याची माहिती मिळताच राकेश अधिक संतप्त झाला.(crime news)

राकेश रविवारी रात्री आठ वाजता नितेशच्या दुकानाजवळ गेला आणि तक्रार केल्‍याबद्दल दमदाटी करू लागला. नितेशने भाऊ पंंकज याला बोलावून घेतले. तेव्हा राकेशने चाकूने पंकजवर वार केले. या घटनेनंतर राकेश पळून गेला. राकेश ठाणकरपाडा भागात दादागिरी करत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.(thane crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Mumbai News: बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर, महापालिका निवडणूक आचारसंहितेचा फटका

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; हाय पावर कमिटीकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

कधी सुरू झाला कधी संपला समजलंच नाही! झी मराठीच्या 'या' मालिकेने अचानक घेतला निरोप; प्रेक्षकही चकीत

SCROLL FOR NEXT