मुंबई

गुन्हे कमी होण्यासाठी पोलिसांची जनजागृती

CD

कळवा, ता. २३ (बातमीदार) : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सध्या सोनसाखळी, घरफोड्या आणि फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार कळवा ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा, खारेगाव, विटावा भागात कळवा पोलिसांनी परेडच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.
सध्या मे महिना सुरू आहे. त्यातच शाळा बंद असल्याने आणि प्रचंड उकाडा वाढल्याने अनेक कुटुंबे गावी गेली आहेत. तर काही जण कुटुंबासह बाहेरगावी फिरायला गेली आहेत. याची संधी साधत चाळीतील आणि इमारतीमधील बंद घरांना रात्री व दुपारी लक्ष्य करून चोरटे घरफोडी करत आहेत. दुसरीकडे सकाळ, संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा काही अज्ञात तरुण दुचाकीवरून येऊन सोनसाखळी खेचून पलायन करतात. अनेकदा रिक्षा अडवून आम्ही पोलिस आहोत, असे भासवून दागिने लंपास करतात. तर काही जणांना पोलिसांची बतावणी करून आम्ही तुमचे दागिने नीट ठेवून देतो. तुमच्या कपड्यावर घाण पडली आहे, असे सांगत लूट केल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. अशा घटना घडू नयेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने कळवा पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पोलिस परेड आणि करत असलेल्या जनजागृतीमुळे कळवा परिसरात नागरिकांची फसवणूक व गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. याचा आम्हाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अशोक उतेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळवा पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

मुंबईची पहिली महिला BMC कमिश्नर! देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी कशा बनल्या अश्विनी भिडे? जाणून घ्या रिअल स्टोरी...

गुगलवर 'फिमेल सर्व्हीस' सर्च करणं पडलं महागात; महिलांनी भेटायला बोलावलं अन्...; धक्कादायक घटना समोर

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

SCROLL FOR NEXT