मुंबई

पर्यावरण पूरक उत्पादनांवर ओरिफ्लेमचा भर

CD

मुंबई, ता. २३ : सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील मोठा स्वीडिश ब्रँड ओरिफ्लेमच्या भारतातील पहिल्या महिला प्रमुख एडिटा कुरेक यांनी पर्यावरणपूरक, सुरक्षित तसेच दर्जेदार उत्पादने बाजारात आणण्यावर भर दिला असून भारतात गुंतवणूक वाढविली जाईल, असे सांगितले.
ओरिफ्लेमतर्फे पर्यावरण आणि ग्राहक या दोघांनाही सुरक्षित ठेवणारी नावीन्यपूर्ण सौंदर्यप्रसाधने उत्पादित केली जातात. या मूल्यांसोबतची बांधिलकी जपल्याने त्यांना मागील वर्षी शाम्पूच्या पॅकेजिंगसाठी इनोव्हेशन आयएफसीएस स्टार पुरस्कार मिळाला. हे पॅकेजिंग शंभर टक्के पुनर्वापराच्या प्लास्टिक बाटलीमधून केले जाते. ओरिफ्लेमला युरोपमधील पर्यावरणरक्षक असा पुरस्कारही फायनान्शिअल टाइम्स आणि स्टेटस यांनी २०२१ पासून चार वेळा दिला आहे. जगभरातील ओरिफ्लेम च्या सर्व कचेऱ्यांमध्ये २०१८ पासून शंभर टक्के स्वच्छ विजेचा वापर होतो, असेही कुरेक म्हणाल्या.
ओरिफ्लेमने शाकाहारी प्रमाणित १३० उत्पादनांना प्रोत्साहन दिले असून कठोर अशा युरोपीय सुरक्षा मानकांच्या आधारे त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता सर्वोच्च ठेवली आहे. २०२३ मधील त्यांच्या उत्पादनांपैकी ९५ टक्के उत्पादने ही विघटनशील आहेत. तसेच त्यांची अकरा प्रमुख उत्पादने जागतिक दर्जातील मान्यताप्राप्त झाली आहेत.
ओरिफ्लेम ची भारतात दोन उत्पादन केंद्रे असून येथून जगभरात साहित्य निर्यातही होते. आता कंपनीतर्फे भारतात जास्त गुंतवणूक केली जाणार असून त्यांच्या विक्रीतील १२ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. कंपनीचा आर अँड डी विभागही आता लौकरच भारतात येईल, असेही त्या म्हणाल्या. भारतात आता सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात नियंत्रणे ठेवणारा कायदा आल्याने घातक नसलेली, पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना काही फरक पडणार नाही. मात्र दर्जा न राखणाऱ्या उत्पादकांना कठीण जाईल, असेही कुरेक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT