मुंबई

अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीत गुरुवारी दुपारी झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच उद्योगमंत्री उदय सामंत, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या स्फोटात जखमींवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. खासदार शिंदे यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेत स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरात नुकसानभरपाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. तसेच, डोंबिवली एमआयडीसीत वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता रासायनिक कंपन्यांचे वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केले जाणार असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT