मुंबई

डोंबिवली आग चौकट

CD

मुख्य बातमीत जोडून घेणे
-------------------------------------
सर्वत्र गोंधळाचे वातावरण
डोंबिवलीच्या इतर परिसरातदेखील या स्फोटाचे हादरे बसले. नक्की काय होतंय, हे समजत नसल्याने नागरिकांना प्रथम भूकंप होत आहे, असे वाटल्याने नागरिकांनी घराबाहेर येत रस्त्यावर पळ काढला. बाहेर पडल्यानंतर कुठे काही झाल्याचे समजत नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. त्यानंतर एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आल्यानंतर नागरिक घरात गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
---------------------------------
कार्यक्रम स्थळावर धावपळ
कंपन्यांच्या बाजूलाच असलेल्या दुर्वांकुर हॉलमध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता; तर साईबाबा मंदिराजवळ एक साखरपुडा होता. स्फोट होताच कार्यक्रमस्थळी असलेल्या नागरिकांनी बाहेर पळ काढला. तसेच जेवण बनवणाऱ्या आचारी, कर्मचाऱ्यांनी तेथील सिलिंडर, तेल यांसारखे ज्वलनशील पदार्थ हॉलच्या बाहेर सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली.
-----------------------------------------------------
आमची माणसे कुठे शोधू?
अनेकांचे नातेवाईक हे बेपत्ता असून त्यांचा शोध लागत नसल्याने हेल्पलाइन नंबर आहे का, ज्याच्यावर संपर्क साधून आपल्या माणसांचा शोध घेता येईल किंवा आपली माणसे बेपत्ता आहेत, हे सांगता येईल, याचादेखील नागरिक शोध घेत होते. मात्र, त्यांना असा कोणताही हेल्पलाइन नंबर नसल्याचे समजल्यामुळे निराशा होत होती. आम्ही आमची माणसं कशी शोधायची, कुठे शोधायची, असा प्रश्न व्याकुळतेने विचारत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT