मुंबई

मजुरीची रक्कम शेतकऱ्याच्या हिशोबपट्टीतून कपात करा

CD

मजुरीची रक्कम शेतकऱ्याच्या हिशेबपट्टीतून कपात करा
उच्च न्यायालयात याचिका, राज्य माथाडी कामगार संघटनेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी असोसिएशनने शेतकऱ्यांच्या हिशेब पावतीतून हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो कामगार बेरोजगार होणार आहेत. याविरोधात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्या, उपबाजार आवारामधील परवानेधारक व माथाडी मंडळांमध्ये सुमारे २,७०० माथाडी आणि मापारी कामगार आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या शेतमालाच्या हिशेब पावतीतून हमाली, तोलाई वाराईसह लेव्हीची रक्कम व्यापारी वर्गाकडून कपात न करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये कामे करणाऱ्या माथाडी आणि मापारी कामगारांवर बेरोजगारीचे संकट येणार असून पूर्व प्रचलित पद्धतीने माथाडी, मापारी कामगारांच्या मजुरीची रक्कम शेतकऱ्याच्या हिशेबपट्टीतून कपात करण्याबाबत न्यायालयाने निर्देश देण्याची मागणी कामगारांनी याचिकेतून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT