Navi Mumbai lehesun sakal
मुंबई

Navi Mumbai: लसणाचे दर २०० पार, आवक कमी असल्‍याने भाववाढ

CD

Navi Mumbai News: एपीएमसीतील घाऊक बाजारात लसूण १५० ते १६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून किरकोळ बाजारात लसणाचे दर २०० पार आहेत. सध्या आगोटीचे कामे करण्याची लगबग सुरू असून वर्षभराचा मसाला करण्यासाठी लसणाचा वापर करतात. मात्र दर वाढल्‍याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.


घाऊक बाजारात लसणाचे दर ५० ते ७० किंवा जास्तीत जास्त १०० रुपये किलोपर्यंत असतात, मात्र आठ महिन्यांपासून लसणाच्या दर चढे असून किरकोळ बाजारात लसणाचे दर २०० रुपये किलो आहेत. मध्यंतरी आवक कमी झाल्‍याने लसणाचे दर घाऊक बाजारात ३०० ते ३५० रु किलो झाले होते.

त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण ४०० पार गेला होता. त्‍यानंतर आवक वाढल्‍याने दर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लसणाचे दर पूर्ववत होतील, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र घाऊक बाजारात १५० वर स्थिरावलेले दर अद्याप कायम आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचे दर महिनाभरापासून २०० रुपये किलोच्या वर आहेत. पावसाळ्यात त्‍यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

दोन महिने दर स्‍थिर


गतवर्षी लसणाचे उत्पादन ५० टक्केच झाले होते. सध्या घाऊक बाजारात लसूणच्या ५ ते ६ गाड्या येत आहेत. मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने दर वाढले आहेत. त्‍यामुळे ग्राहकांना लसणासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. आणखी दोन महिने हीच परिस्‍थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT