मुंबई

Navi Mumbai News: डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, सायन-पनवेल मार्गावर झाला आपघात

CD

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : घाटकोपर येथून तळोजा येथे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव डम्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात सीबीडी पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर पुणे मार्गिकेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

घाटकोपर येथील भटवाडी परिसरात राहणारे अभिषेक मांजरेकर (४२) दुचाकीवरून तळोजा येथे कामानिमित्त जात होते. सकाळी १०.३० च्या सुमारास अभिषेक सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा ब्रिजच्या उतारावर पुणे मार्गिकेवर पाठीमागून आलेल्या डम्परने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी अभिषेकला तातडीने कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी डम्परचालक आरिफ शेख (२८) याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

SCROLL FOR NEXT