मुंबई

कोळंबी, बोंबील, तेंडली सुकटला मागणी

CD

ठाणे, ता. २९ (बातमीदार) : पावसाळ्यादरम्यान मासेमारी बंद करण्यात येते. परिणामी, ओल्या माशांची आवक कमी असते. त्यामुळे पावसाळ्यात खवय्यांचा सुकी मच्छी खाण्याकडे कल असतो. पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी सुक्या मासळीची साठवणूक केली जाते. त्यामुळे मासळी खरेदीसाठी खवय्यांची ठाण्यातील बाजारात गर्दी होत आहे.

यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर ठाण्यातील मच्छी मार्केट हा सुकी मच्छीने गजबजला आहे. तसेच अनेक परिसरांमध्ये महिला मच्छीचे वाटे घेऊन बसल्याचे दिसत आहे. यातील काही महिला या स्थानिक आहेत, तर काही भिवंडीवरून विक्रीसाठी आलेल्या आहेत. बाजारात सुरमई, बांगडा, कोलीम, मांदेली, कोळंबी, बोंबील, तेंडली सुकट इत्यादी सुक्या मच्छीची आवक वाढली आहे. प्रतिकिलोमागे साधारण १०० ते १५० रुपये भाववाढ झाली आहे. बाजारातील विक्रेते भिवंडी तसेच वाशी मार्केटमधून सुकी मच्छी घेऊन येत आहेत. सर्व प्रकारची मच्छी बाजारात उपलब्ध झाली आहे. तर या मच्छी खरेदीसाठी ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, असे विक्रेत्या रजनी पाटील यांनी सांगितले.

सुकी मच्छी वर्षभर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असली तरी पावसाळ्यात त्यांची मागणी अधिक वाढते. मे महिन्याच्या अखेरीस मासेमारीचा शेवटचा दिवस असतो. त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने मासेमारीवर काही महिने बंदी असते. त्यामुळे या काळातच सुकी मच्छी हाच मच्छीमारांना मोठा आधार मिळत आहे. इतर मासळी मिळत नसल्यामुळे खवय्यांचीदेखील सुक्या मच्छीला चांगलीच मागणी आहे.


डब्यासाठी सुकी मच्छी हा झटपट होणारा पदार्थ असल्याने वर्षभर आम्ही त्याचा वापर करतो. पावसाळ्यातही ओल्यापेक्षा सुकी मासळी खाणे सोयीचे वाटते.
- मनीषा पाटील

आताच सुकी मच्छी घेऊन ठेवली की पावसाळ्यात कुठेही भाजीसाठी जायची गरज लागत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल इतकी मच्छी घेतली आहे.
- प्रिया भोईर

किती महाग झाली, तरी सुकटीशिवाय जेवण जात नाही. म्हणून ज्या दिवशी उपवास नसेल त्या दिवशी पावसाळ्यात आमच्या घरी सुकी मच्छी केली जाते.
- रोहिदास मढवी

सुकी मच्छी दर (प्रतिकिलो)
सोडे - १,००० ते १,५०० रु.
बोंबील - ४०० ते ५०० रु.
जवळा - १०० रु.
सुरमई - ६०० रु.
अंबाडी - ५०० रु.
वाकटी - २५० ते ५०० रु.
मांदेली - २०० रु.
बांगडा - २० प्रतिनग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

SCROLL FOR NEXT