मुंबई

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

CD

वाशी, ता. १ (बातमीदार) : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने चाणक्य सिग्नलजवळ पूर्वेकडील बाजूस जांभूळ आणि पश्‍चिमेकडील बाजूस बांबूची लागवड करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, विभाग अधिकारी तथा सहायक आयुक्त शशिकांत तांडेल आदी अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या ठिकाणी १०० जांभूळ व २०० बांबूंची लागवड करण्यात येणार असून या पावसाळी कालावधीत माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दीड लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व झाडे देशी तसेच नवी मुंबईची जैवविविधता वाढवणारी असणारी आहेत. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

Agniveer Jobs Uttarakhand: अग्निवीरांसाठी मोठी खूशखबर; उत्तराखंडमध्ये आता लेखी अन् शारीरिक चाचणीविना मिळणार सरकारी नोकरी!

Mumbai News: 'बार्बेक्यू नेशन'मध्ये डेझर्टच्या प्लेटवर झुरळ; ग्राहकाकडून स्वच्छतेबाबत चिंता; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT