मुंबई

तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती

CD

तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांचा फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडतर्फे सन्मान करण्यात आला. मुलुंड येथील कर्करोग विशेषज्‍ज्ञांनी शुक्रवारी (ता. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा केला.
कर्करोगाने पीडित रुग्‍णांचा उत्‍साह वाढवण्यासाठी आणि त्‍यांना आजारातून बाहेर काढण्यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. जागरूकता करण्‍यासाठी आरोग्‍य तपासणी शिबिर आणि माहितीपूर्ण सत्राचे आयोजन केले होते. डोके आणि मान शस्‍त्रक्रिया सल्‍लागार डॉ. हितेश सिंघवी यांच्‍या नेतृत्‍वाखालील वैद्यकीय तज्‍ज्ञांची टीम, फिजिओथेरपिस्ट, डायटेशियन्‍स व सायको ऑन्‍कोलॉजिस्‍ट्स यांनी तब्बल १०० हून अधिक उपस्थितांना माहिती दिली. वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली.
या उपक्रमामध्ये आरोग्‍यदायी आहार, सवयी, नियमित व्‍यायाम, संपूर्ण दंत आरोग्य आणि कर्करोगाचे व्‍यवस्‍थापन, सकारात्‍मक मानसिकता याबाबत अमूल्य मार्गदर्शन करण्‍यात आले. तसेच तज्‍ज्ञांनी तोंडाची स्‍वत:हून तपासणी करण्‍यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. रुग्‍णांच्‍या समस्‍यांचे निराकरण केले. त्‍यानंतर कर्करोगावर मात केलेल्या आणि त्यांच्या कुटुंबांमधील सदस्‍य, डॉक्‍टरांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. याद्वारे तंबाखूच्‍या सेवनामुळे आरोग्‍य व जीवनशैलीवर होणाऱ्या दुष्‍परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे सुविधा संचालक डॉ. विशाल बेरी म्‍हणाले, कर्गरोगावर मात केलेल्या रुग्णांना वैयक्तिक व वेळेवर काळजी घेण्याची गरज असते. या उपक्रमाद्वारे आम्‍ही त्‍यांना सामान्‍य जीवन जगण्‍यास मदत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT