मुंबई

घरफोडी करणारा सराईत चोरटा अटकेत

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : बंद असलेली घरे हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला रबाळे पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख (४६) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांतील ६० ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ऐरोली सेक्टर-१ मधील साईनाथ वाडीत राहणारे मयूर धर्मनाथ सैतवाल (३२) हे १४ मे रोजी रोजी सकाळी ९ वाजता आपले घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा कुलूप तोडून घरातील सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले होते. याबाबत रबाळे पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन संशयित आरोपींची माहिती मिळविली. त्यावरून पोलिसांनी जुने गुन्हे अभिलेख तपासले असता, यातील संशयित आरोपीचे नाव शफिक अब्दुल शेख उर्फ टोपी असल्याचे समजले. तपास करत असताना २८ मे रोजी भिवंडीतील घुंगटनगर परिसरात शफिक पायी चालत जात असताना पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेवुन रबाळे पोलिस ठाण्यामध्ये आणले.

---------
गुन्ह्यांची कबुली
रबाळे पोलिसांनी शफिक उर्फ टोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसा घरफोडीचे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सर्व गुन्ह्यांतील ६० ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. या चोरट्याकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT