मुंबई

नालासोपारा अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

CD

अनैतिक संबंधांतून महिलेची हत्या

बोळींज, ता. १ (बातमीदार) : नालासोपाऱ्यातील धानिव बाग येथे अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पेल्हार पोलिसांना यश आले आहे. सायराबानू शाह (वय ३४) असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मृत महिलेच्या पतीचा भाचा नजाबुद्दीन सम्मी (वय २१) याला दिल्ली येथून अटक केली.

नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग येथील डोंगराखाली असलेल्या ओव्हळात मंगळवारी (२८ मे) एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती. मात्र तिची ओळख पटत नव्हती. पोलिसांना या मृतदेहाशेजारी एक वापरलेले कंडोम आणि एक स्प्रे आढळून आला. तोच दुवा पकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. त्या स्प्रेवर असलेल्या बॅचवरून पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानात तपास सुरू केला. त्यावेळी एका अनोळखी तरुणाने शुक्रवारी (२४ मे) हा स्प्रे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून हा तरुण पोशाखावरून मुस्लिम असल्याचा तर्क लावण्यात आला. त्यावरून परिसरातील मतदार याद्यांमधील मुस्लिम महिलांची नावे तपासत या मृत महिलेचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच धानिव बाग येथील एका घरात जियाउल शहा याच्या घरात मृत महिलेचा फोटो घेऊन विचारपूस केली असता हत्या झालेली महिला ही जियाउल याची पत्नी असल्याचे समजले. ती मागील ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला मेडिकल दुकानातून त्या तरुणाचे सीसी टीव्ही चित्रण दाखवले असता स्प्रे घेऊन जाणारा तरुण जियाऊल याचा भाचा असून तो दिल्लीला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

...
आरोपीला दिल्लीतून अटक
आरोपी नजाबुद्दीन हा दिल्लीतील एका बेकरीत काम करत असल्याची माहिती पेल्हार पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीच्या अमनविहार परिसरातील सुमारे दीडशे बेकऱ्यांमध्ये आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी एका बेकरीत काम करत असलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३१) आरोपीला अटक केली. आरोपी नजाबुद्दीन आणि सायराबानू यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायराबानू संतप्त झाली होती. या वादातून तिची हत्या केल्याची कबुली नजाबुद्दीनने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT