मुंबई

कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्यावर हल्ला,

CD

कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्यावर हल्ला

नेरळ, ता. १ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विरले हे गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केल्याचे समोर आले आहे. विरले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यामध्ये विरले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता. ३१) ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरमअभावी ती तहकूब करण्यात आली. ग्रामसभा तहकुब झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सरपंच महेश विरले, तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले हे ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. त्याच वेळी साधारण ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याचा राग धरून विरले यांना शिवीगाळी करू लागले. या वेळी दिव्यासू चंद्रकांत हजारे, चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे हे तिथे दाखल झाले. यावेळी विजय हजारे व दिव्यासू हजारे यांनी महेश विरले यांना लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण केली. हा गोंधळ पाहून तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले व सोमनाथ विरले हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी विजय हजारे, दिव्यासू हजारे, चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच चंद्रकांत हजारे व विजय हजारे यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT