मुंबई

हातोडा पडून देखील अनधिकृत बांधकामे तेजीत

CD

अनधिकृत बांधकामे तेजीत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर नेहमी टीकेची झोड उठविण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनीदेखील अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असताना दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वी जी अनधिकृत बांधकामे कारवाई करून जमीनदोस्त केली होती, त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने बांधकामे उभी राहत असल्याचा प्रकार माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या बांधकामांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, मानपाडा, माजिवडा आदी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरून भाजप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असताना आजही बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांपूर्वी कासारवडवली परिसरात मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक गाळे उभे राहिले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी या सर्व गाळ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर मागील वर्षभरात पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृतरित्या गाळे उभारण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे गाळे उभारताना पत्र्याची एक मोठीच्या मोठी भिंत येथे उभारण्यात आली होती. या भिंतीच्या आड या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले.


अनधिकृत गाळ्यांनाही पाणी, वीज जोडणी
कासारवडवली येथील गाळे अनधिकृत असतानाही त्याला पाणी आणि वीज जोडणी देण्यात आली आहे. आतील बहुतांशी गाळ्यांमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत. गाड्या धुणे, केस कर्तनालय, जनरल स्टोअर आदी सुरू आहेत. या अनधिकृत गाळ्यांच्या संदर्भात ठाणे महापालिकेकडे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही या बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यासंदर्भात माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली असून कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT