मुंबई

दुसऱ्या दिवशीही वाहतूक कासगतीने

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दुसऱ्या दिवशीही रस्ते वाहतुकीवर ताण पडला. पूर्व द्रुतगती महामार्गावर, पश्चिम द्रुतगती मार्गावर आणि पूर्व मुक्त मार्गावर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शनिवारीही वाहतूक कासवगतीने सुरू होती.
मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकात गर्दी झाल्याने अनेकांनी सावधगिरीचा मार्ग म्हणून रेल्वेऐवजी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडला होता. त्याचा प्रतिकूल परिणाम दुसऱ्या दिवशीही रस्ते वाहतुकीवर दिसून आला. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दुचाकी, चारचाकीचा पर्याय निवडल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर जास्त वाहतूक कोंडी होती. अशातच सध्या मुंबईत उन्हाची तीव्रता वाढल्याने कोंडीसोबतच अनेकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला.
-------------------------
खासगी वाहनचालकांकडून लूट
शनिवारी कामासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे ओला, उबरला मोठ्या प्रमाणात मागणी होती. अशातच ऐन गर्दीच्या वेळेत महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक कोंडीने भाडेदरातही वाढ झाल्याने अनेकांच्या खिशाला झळ बसली.
-------------
रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने वडाळा येथून दुचाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पूर्व द्रुतगती महामार्गावर व शहरातदेखील वाहतूक कोंडी झाली होती; पण कामावर जाणे आवश्यक असल्याने कितीही त्रास झाला तरी ऑफिसला जाणे महत्त्वाचे होते.
- प्रफुल्ल मोहिते, वाहनचालक
---
शनिवार असल्याने काही जणांना कामावरून सुटी होती, त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत कमी प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले.
- अथर्व काळे, प्रवासी
----------------------
शनिवार असूनही अनेकांना इच्छा असूनही सुटी घेता आलेली नाही. कामावर येण्याची अपरिहार्यता असल्याने कार्यालय गाठणे आवश्यक होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकल्याने कामावर लेटमार्क लागला.
- दीपाली जाधव, प्रवासी
-----
कुर्ला रेल्वे स्थानकातून वाशीनाका येथे रिक्षाने गेल्यास ८५ रुपये मीटर होतो; पण सायंकाळी गर्दी पाहून रिक्षाचालक १५० रुपयांची मागणी करत होते. तर टॅक्सीचालक २०० ते २५० रुपयांची मागणी करत होते.
- विवेक कदम, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

SCROLL FOR NEXT