मुंबई

मॅनहोल्सचा धोका अजूनही कायम

CD

मॅनहोल्सचा धोका अजूनही कायम
पालिकेने न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत; युद्धपातळीवर काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पावसाळा तोंडावर आला तरी मॅनहोल्सबाबत न्यायालयाने दिलेले आदेश अजूनही पालिकेने पाळलेले नाहीत. त्यामुळे मॅनहोल्सचा धोका अजूनही कायम आहे. २०१८ ते २०२३ दरम्‍यान पूरप्रवणग्रस्‍त भागातील मलनिस्सारण वाहिनी व पर्जन्‍य जलनिस्सारण वाहिनी यांच्‍या प्रवेशिकांवर ६ हजार ३०८ संरक्षक जाळ्या बसविण्‍यात आल्‍याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिकेच्‍या मालकीच्‍या मलनिस्सारण वाहिनीवरील प्रवेशिकांवर झाकणे बसविण्‍यात आलेली आहेत. उघड्या प्रवेशिकांवरील झाकणाबाबतची तक्रार प्राप्‍त होताच सदर ठिकाणी बॅरिकेटस बसविणे, झाकणे बसविण्‍याची कार्यवाही २४ तासांच्‍या आत करण्‍यात येते, असे पालिकेने म्हटले आहे.

मुंबईतील २०१८ ते २०२३ दरम्‍यान पूरप्रवणग्रस्‍त भागातील मलनिस्सारण वाहिनी व पर्जन्‍य जलनिस्सारण वाहिनी यांच्‍या प्रवेशिकांवर ६ हजार ३०८ संरक्षक जाळ्या बसविल्‍या आहेत. संरक्षक जाळ्यांची पाहणी उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार ॲडव्‍होकेट कमिशनर आणि संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्‍त यांच्‍यामार्फत ऑगस्‍ट, सप्‍टेंबरदरम्‍यान पूर्ण झालेली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

जाळ्या बसविण्याची कार्यवाही सुरू
उर्वरित ९४ हजार नग संरक्षक जाळ्या बसविण्‍याबाबतची कार्यवाही २४ विभाग कार्यालयांमार्फत सुरू असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्‍यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT