मुंबई

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सुवर्णसंधी

CD

वाणगाव, ता. २ (बातमीदार) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शासन मान्यताप्राप्त आसनगाव स्थानक-वाणगाव येथील कृषी तंत्र विद्यालयात दोनवर्षीय मराठी माध्यमाचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला २४ मेपासून सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी आपला प्रवेश निश्र्चित करावा, असे आवाहन प्राचार्य सोनालिका पाटील यांनी केले आहे.
पालघर जिल्ह्यातील एकमेव अ श्रेणी दर्जा प्राप्त असलेले आणि गतवर्षी विद्यापीठाने अधिक तुकडी वाढीसाठी मान्यता दिलेल्या वाणगावमधील कृषी तंत्र विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील दोनवर्षीय मराठी माध्यमाचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३० जूनपर्यंत ऑफलाईन पद्धतीने विद्यालयांत राबवण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील कृषी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य पाटील यांनी केले आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा; तसेच बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

नोकरी व व्यवसायाची संधी
१) ग्रामसेवक, कृषी सेवक हे शासकीय पद
२) शासकीय कृषी योजनेत विविध पदांवर सर्वेक्षक पद
३) सिंचन विभागात कालवा निरीक्षक व इतर समकक्ष पदांवर नोकरी
४) विविध नामांकित बी-बियाणे, खते, कीटकनाशके उत्पादित कंपनीत; तसेच इरिगेशन कंपनीत नोकरी
५) कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहायक पद
६) स्वतःचे कृषी सेवा केंद्र, गांडूळ खत उत्पादन, शेतमाल प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, कुक्कु‍टपालन, शेळीपालन उभारता येते.
७) शेतीसाठी उपयुक्त अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाची माहिती होते.

एसटी, एससी, एनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के आणि ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के सरकारची शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे. तरी नमूद केलेल्या मुदतीमध्ये प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
- सोनालिका पाटील, प्राचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT