मुंबई

ठाण्यात नौपाडा, राबोडी पोलिसांचे मॉकड्रिल

CD

ठाणे, ता. २ (वार्ताहर) : पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या बिकट परिस्थतीत पावसाचे पाणी साचल्यानंतर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका कशी करावी, याची रंगीत तालीम नौपाडा पोलिस ठाण्याच्यावतीने शुक्रवारी (ता. २) सकाळी, तर राबोडी पोलिस ठाण्याने दुपारी केली. यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी, पालिका स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन मंडळाच्या जवानांचा समावेश होता.
नौपाडा येथील चिखलवाडी सार्वजनिक शौचालयाजवळ शुक्रवारी सकाळी ११.२० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने जवळील झोपडपट्टीतील काही रहिवासी अडकले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. घटनास्थळी नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, पालिकेची रुग्णवाहिका दाखल झाली, अशी नौपाडा पोलिसांची रंगीत तालीम अर्धा तास सुरू होती.
दुसरीकडे ठाणे पश्चिम येथील आनंद तरे बंगल्याजवळील, श्रीरंग सोसायटीत पावसाचे पाणी साचल्याने इमारतीमधील काही रहिवासी अडकले होते. ही माहिती मिळताच राबोडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सो. आणि कर्मचारी, उपकार्यकारी अभियंता (उथळसर प्रभाग समिती), अग्निशमन दलाचे जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, पालिकेच्या एका रुग्णवाहिकेसह त्वरित घटनास्थळी पोहचले. राबोडी पोलिस ठाण्याची रंगीत तालीम १२ मिनिटांत संपवून नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT