मुंबई

फायर ऑडीटच्या प्रश्नावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील पेड्रियाट्रिक थॅलेसेमिया विभागात लागलेल्या आगीवरून नवी मुंबईचे राजकारण तापले आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत महापालिकेसहीत सर्व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली आहे. नाईक यांच्या या पाहणी दौऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपने ही स्टंटबाजी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे आरोप वैफल्यग्रस्त परिस्थितीतून आल्याचे सांगत नाईक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची धूळ अद्याप विसावलेली नाही. तोच नवी मुंबईत आता विधानसभेचे आवाज घुमू लागले आहेत. संदीप नाईक यांनी महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देत पेड्रियाट्रिक थॅलेसेमिया विभागाची पाहणी केली. या प्रसंगी ऑक्सिजनच्या वाहिनीवरील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. या प्रकरणी रुग्णालयात बायोमेडिकल अभियंता नियुक्त करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. कोरोना काळात महापालिकेने लावलेल्या ऑक्सिजन प्लांट, वाहिन्या यांची पडताळणी करण्याची गरजही नाईक यांनी व्यक्त केली. तसेच महापालिकेसोबत नवी मुंबईतील बेलापूर ते दिघ्यापर्यंतच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली; मात्र नाईकांच्या या दौऱ्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत टीका केली.
------------
एकमेकांना प्रतिप्रश्‍न
गेली दहा वर्षे संदीप नाईक आमदार होते. त्याआधी ते महापालिकेचे स्थायी सभापती होते. त्यांच्या घरात मंत्री, महापौर, खासदार अशी अनेक पदे होती. मग त्यावेळेस असे दौरे करून महापालिकेच्या रुग्णालयाचे प्रश्‍न मार्गी का लावले नाहीत, असा प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून असे दौरे केले जात असल्याचा टोला त्यांनी नाईक यांना लगावला. काँग्रेसच्या नेत्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वश्रुत असल्याचे प्रत्युतर नाईक यांनी दिले. गेल्या तीन वर्षांत महाविकास आघाडीची सत्ता होती. तेव्हा हे प्रश्‍न का सुटले नाहीत, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT