मुंबई

डहाणू येथे ट्रकची रिक्षाला भीषण घडक

CD

डहाणू येथे ट्रकची रिक्षाला भीषण धडक
आई व पाच वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
डहाणू, ता. २ (बातमीदार) : सूर्यानगर राज्य मार्गावर रिक्षा आणि राख वाहतूक करणाऱ्या ट्रकचा (बलकर वाहन) भीषण अपघात झाला. या घटनेत एक महिला व तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिल्वासा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

डहाणू येथे रविवारी (ता. २) दुपारच्या सुमारास ‘आसवे’ गावाजवळ चारोटीहून डहाणूकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला राख भरून चारोटीकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रवासी रिक्षा शेजारील शेतात फेकली गेली. या रिक्षातून प्रवास करणारे सुवर्णा लाडवी व तिचा पाच वर्षांचा मुलगा प्रशांत (रा. निकावली) यांचा जागीच मृत्यू झाला; तर काशिनाथ डुप्ले, कांचन डुप्ले व विक्रम लाडवी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे दाखल केल्यानंतर तिथून पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून डहाणू पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT