मुंबई

पाणी टंचाईमुळे करंजाडेकर त्रस्त

CD

पनवेल, ता. २ (बातमीदार) : करंजाडे वसाहतीमधील रहिवासी पाणीटंचाईने त्रास्त झाले असून त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी नागरिकांची बैठक घेऊन सिडकोला पाणीटंचाईसंदर्भात अंदोलन करून जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी सिडकोविरोधात करंजाडेवासीयांनी संताप व्यक्त केला. पाण्याच्या टंचाईबाबत सिडकोने तत्काळ कार्यवाही केली नाही तर सिडकोविरोधात करंजाडेवासीय लवकरच जाब मोर्चा काढणार आहेत. या सभेला करंजाडे वसाहतीतील महिला, नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले आहे. हे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. पाण्याअभावी होणाऱ्या त्रासाचा जाब सिडको अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या जाब मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी विनोद साबळे यांनी केले. आम्हाला हक्काचे पाणी मिळणार आहे का नाही, असा सवाल या वेळी विचारण्यात आला. १० जूनपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जाब मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा या सभेत देण्यात आला. सोमवारी (ता. ३) पाणीटंचाईबाबत सिडकोला पत्र देण्यात येणार आहे. या पत्रावर त्वरित कार्यवाही झाली नाही तर येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने जाब मोर्चा काढणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

Latest Marathi News Live Update : मुंबईचं तापमान वाढणार, काही जिल्ह्यांमध्ये होणार पावसाची बरसात

Pune Crime: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू; चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं!

पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

Free Education for Girls Maharashtra : मुलींना उच्चशिक्षण मोफत, पण विकास शुल्कचे बंधन; महाविद्यालय आकारतात 15 ते 25 हजार रुपये

SCROLL FOR NEXT