मुंबई

तुर्भे इंदिरानगरमध्ये गुंडाची दहशत

CD

तुर्भे इंदिरानगरमध्ये गुंडाची दहशत
चौघा भावांवर प्राणघातक हल्ला; आरोपींचा शोध सुरू
नवी मुंबई, ता.२ (वार्ताहर) : तुर्भे इंदिरानगरमध्ये वावरणाऱ्या कल्लु नामक गुंडाने व त्याच्या साथीदारांनी जेवणासाठी १०० रुपये न दिल्याचा राग मनात धरत चौघा भावांवर लाकडी बांबू व दगडाच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात चौघे भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुंड कल्लु व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

रितेश सोनकर (वय २५), उमेश (वय १८), संदिप (वय १७), रिंकु (वय २८) अशी या घटनेतील जखमी भावांची नावे असून ते तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरानगरमध्ये राहण्यास आहेत. हे सर्व जवळच असलेल्या एका डेअरीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (ता.३१) रात्री १० वाजण्याच्या सुमारास हे चौघे डेअरीतील काम उरकून जेवण करण्यासाठी आपल्या घरी जात होते. यावेळी रस्त्यामध्ये कल्लु याने रितेशकडे जेवणासाठी शंभर रुपयांची मागणी केली, मात्र रितेशने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने कल्लुने त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे रितेशच्या भावांनी त्याला विरोध केला. यावेळी कल्लु व त्याच्या तीन साथीदारांनी रितेशच्या डोक्यात दगडाने मारून त्याला जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या उमेश, संदिप, रिंकु यांनाही आरोपींनी लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांच्या मदतीसाठी आलेल्या नागरिकांनाही कल्लुने धमकावत घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर या जखमींनी वाशीतील महापालिकेचे रुग्णालय गाठले. उपचारानंतर त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कल्लु आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार पुन्हा घसरला! RBIच्या निर्णयाआधी गुंतवणूकदार सावध; युद्धाच्या काळातही Godrej शेअर तेजीत

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

Latest Marathi News Live Update : गोराई बीचवर बेकायदेशीर घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतीचा प्रकार उघड

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅसचे ४,३५५ सिलिंडर शिल्लक; पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT