मुंबई

भिवंडी परिवर्तनाच्या उंबरठ्यावर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत आहे. सुरुवातीला या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळाली; पण प्रचार ऐन रंगात येत असताना सांबरे बॅकफूटवर गेले.
या मतदारसंघातून कपिल पाटील हे तिसऱ्यांदा खासदार बनण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या स्वप्नांना बाळ्या मामा सुरुंग लावणार असा कल दिसतो. त्यामुळे भिवंडीत पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे ४ जूनलाच समजेल. एक्झिट पोलने कपिल पाटील यांच्या बाजूने कौल दिला आहे. असे असले तरी ग्राऊंड रिपोर्टला परिवर्तन घडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. वास्तविक मुस्लिमबहुल असा हा मतदारसंघ असला तरी मोदी लाटेत दोनवेळा भिवंडीत कमळ फुलवण्यात कपिल पाटील यांना यश आले होते. त्यात केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. सोबतच एकसंघ शिवसेना असताना जी मतांची शक्ती त्यांना मिळत असे ती दोन गटांत विभागल्याने त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे.

ग्राऊंड रिपोर्ट
मुरबाडमध्ये कथोरे यांच्या असहकार्याचा फटका पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. आगरी आणि कुणबी मतांची विभागणी झाली आहे. पण, मुस्लिम व दलित एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या खात्यात पडल्याचे दिसते. ही मते खाण्यासाठी अपक्षांची मोठी फौज उभी करण्यात आली होती. या वेळी मतदार अधिक सजक होते असे दिसले. भाजपला फटका बसेल अशा पॉकेटमधून सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसते. मतदानाच्या दिवशी पाटील यांचा संयम सुटल्याचेही पाहायला मिळाले. त्यावरूनच अनेकांनी त्यांच्या पराभवाचे भाकीत मतदानाच्या दिवशीच केले. तरीही पाटील काठावर पास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कल्याणमध्ये निर्विवाद हॅट्‍ट्रीक
कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निर्विवाद विजयाची हॅट्‍ट्रीक मारणार असे दिसते; मात्र त्यांना अपेक्षित असलेली विक्रमी मते मिळण्याची आशा मावळली आहे. या मतरासंघात त्यांची थेट लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत होती. ठाण्यात जशी दोन शिवसेनेत चुरशीची लढाई पाहायला मिळाली तशी ती कल्याणमध्ये दिसली नाही. एकीकडे डॉ. शिंदे यांचा झंझावती, हायटेक प्रचार, तर दुसरीकडे दारोदारी प्रचार करणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक असे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी ज्या संख्येने मतदार मतदानासाठी उतरला, ती विद्यमान खासदारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्याचा पूर्ण ‘लाभ’ डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाला आहे. सर्वाधिक विकास निधी आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्या जोरावरच ते यावेळी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्या या आत्मविश्वासाचा रथ अडवण्याचा प्रयत्न स्थानिक भाजप नेत्यांकडूनच झाल्याचे दिसले. प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कुठेच नव्हते. मनसेची साथ मतदानात किती परावर्तीत झाली हेही पाहावे लागेल. त्यामुळे सुरुवातीला अगदी सोपी भासणारी येथील लढत मतदानाच्या दिवशी अटीतटीची भासू लागली. किंबहुना त्यामुळेच मतदानाच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलासाठी कल्याणमध्ये धाव घ्यावी लागल्याचेही दिसले.

ग्राऊंड रिपोर्ट
मुंब्रा-कळवा, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानावरच विजयाची मदार असणार आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील हे शिंदे याच्या प्रचारात सक्रिय होते. या पट्ट्यात ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचेही वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातून दोन्ही शिवसेनेला समसमान मते पडण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व हा गणपत गायकवाड यांचा मतदारसंघ असून, त्यांच्या तुरुंगवारीमुळे या मतदारसंघातून शिंदे यांना सहकार्य मिळाले नसल्याचे दिसते. तर मुंब्रा-कळव्यातूनही शिंदे यांना साथ मिळणे कठीण दिसते. पण हा मतांचा टक्का उल्हासनगर, डोंबिवली व अंबरनाथ येथून भरून निघेल, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT