मुंबई

रविना टंडनसह चालकावर जमावाकडून हल्ला

CD

रविना टंडनसह चालकावर जमावाकडून हल्ला
अंगावर गाडी घातल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन आणि तिच्या चालकावर वांद्रे परिसरात शनिवारी (ता. १) रात्री जमावाने हल्ला चढविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप करत जमावाने गोंधळ घातला आणि रविनासह तिच्या चालकाला मारहाण केली. व्हायरल व्हिडीओत रविना ‘प्लिज, मारो मत’ म्हणत, जमावाला समजाविण्याचा प्रयत्न करताना दिसते. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करत पोलिस अधिक तपास करत आहेत.
वांद्रे येथील कार्टर रोडवर ही घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या एका गटाने रविना आणि तिच्या चालकावर, तीन महिलांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून, खार पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेबाबत रविनाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. तिच्या वाहनाने कथितपणे तीन जणांना धडक दिली, त्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यामुळे बाचाबाची झाल्याचा आरोप करण्यात आला. रविना जमावाशी बोलण्यासाठी तिच्या वाहनातून बाहेर पडल्यानंतर तिला धक्काबुक्की करत मारण्यात आल्याचे एका पोलिसाने सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये रविना ‘प्लीज, मारू नका’ असे म्हणताना दिसत आहे. दुसरीकडे, व्हिडीओमध्ये मोहम्मद नावाच्या व्यक्तीने आरोप केले आहेत. त्याने म्हटले आहे, ‘वांद्रे परिसरात रविनाच्या इमारतीबाहेर आई, बहीण आणि भाची फिरत असताना ही घटना घडली. रविनाच्या चालकाने माझ्या आईच्या अंगावर गाडी चढवली. त्यानंतर रविनाने गाडीतून उतरून माझ्या भाचीला, अन्य नातेवाईकांना मारहाण केली, तसेच ती नशेत होती.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT