मुंबई

कांदिवलीत दुभाजकाची दयनीय अवस्‍था

CD

कांदिवलीत दुभाजकाची दयनीय अवस्‍था
डेब्रिज, कचऱ्याचे साम्राज्‍य; सुशोभीकरणातील झाडे नष्‍ट
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) कांदिवली पश्‍चिमेतील न्यू लिंक रोड, मेट्रो रेल्वेखालील दुभाजकांची दयनीय अवस्था झाली आहे. दुभाजकांमध्ये डेब्रिज, कचरा टाकण्यात आला आहे. सुशोभीकरणादरम्‍यान लावण्यात आलेली झाडेदेखील नष्‍ट झाली आहेत.
हिरव्यागार फुलांनी बहरलेले दुभाजक ओसाड पडल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मेट्रो व्यवस्थापन आणि पालिकेने तातडीने पाहणी करून दुभाजकांचे सौंदर्य पूर्ववत करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. कांदिवली पश्‍चिमेला न्यू लिंक रोडवर अंधेरी पूर्व ते डी. एन. नगर अशी मेट्रो रेल्वे दिमाखात धावते. मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रो स्टेशन परिसर तसेच न्यू लिंक रोडमधील दुभाजकांमध्ये लाखो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण केले. विविध झाडांची लागवड करून दुभाजकासह न्यू लिंक रोडच्या सौंदर्यात भर घातली. त्‍यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. एक वेगळे आकर्षण मार्गाला प्राप्त झाले होते, मात्र वर्षभरातच सर्व नागरिकांचा हिरमोड झाला. आम्ही हे दुभाजक महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले असून याबाबत पालिकेला कळवले आहे, अशी प्रतिक्रिया मेट्रोचे अभियंता अशोक सिंग यांनी दिली. देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान अधिकारी सुचिता मावची यांनी दिली.

पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
कांदिवली पश्‍चिम, डहाणूकर वाडी आणि वळनई, मीठ चौकी मेट्रो रेल्वेखालील दुभाजकांची कचरापेटी झालेली दिसून येत आहे. सध्या विविध झाडांऐवजी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. लाखो रुपये खर्च केलेले आकर्षण एका वर्षात नष्ट झाल्याने पर्यावरणप्रेमी, प्रवासी आणि नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT