मुंबई

अंदाज अपना अपना

CD

प्रसारमाध्यमांच्या चाणक्यांनी एक्झिट पोल दिला असला तरी प्रत्येक उमेदवाराने आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या निकालाचा अंदाज बांधला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रमुख उमेदवाराला आपल्या विजयाची शास्वती असून त्यांनी आपआपला अंदाज बांधला आहे.

निष्ठेचा विजय होणार
ठाणे हा निष्ठावंत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे सत्तेची ताकद कितीही लावली तरी विजय निष्ठेचाच होणार याची खात्री आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसघातून किमान एक लाखांची आघाडी घेऊन विजयी होऊ, असा विश्वास आहे.
- राजन विचारे, उमेदवार शिवसेना ठाकरे गट

आमचे पारडे जड
विजय महायुतीचाच होणार यात शंका नाही. किमान दोन ते सव्वा दोन लाखांचा लीड आपल्याला मिळेल. विरोधकांची सर्व गणिते यावेळी चुकीची ठरतील. किमान दीड ते दोन लाखांचा लीड मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला येईल.
- नरेश म्हस्के, उमेदवार शिवसेना शिंदे गट

विजयाची खात्री
विजयाची खात्री आहे, जास्त मताधिक्याने महायुतीचा विजय होणार आहे. २०१९ च्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्याने यावेळी विजय होईल याचा पूर्ण विश्वास आहे. मागील दहा वर्षात येथील नागरिक, शहर विकासाच्या दृष्टीने केलेली विकासकामे, त्यामागची आमची मेहनत याचे खरे श्रेय मताधिक्यात पाहायला मिळेल. निकालानंतर गुलाल उधळून महायुतीचे कार्यकर्ते आनंद साजरा करतील. निकालाच्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झाली आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे, उमेदवार, महायुती कल्याण लोकसभा मतदारसंघ

मनात थोडीशी हुरहुर
मनात थोडीशी हुरहुर आहे की उद्या रिझल्ट लागणार आहे. दीड महिना आम्ही जी मेहनत घेतली त्याचा निकाल आम्हाला समजणार आहे. नागरिकांचा आम्हाला पाठिंबा होता. त्याचा रिझल्ट आम्हाला कळेल. त्यामुळे आनंद आहेच; मात्र रिझल्टची उत्सुकता जास्त असेल. कितीचे मार्जिन मिळेल याविषयीची जास्त उत्सुकता आहे. एक लाख मतांचे मताधिक्य मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. उद्याची आमची पूर्ण तयारी झाली आहे.
- वैशाली दरेकर-राणे, उमेदवार, महाविकास आघाडी, कल्याण लोकसभा मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT