मुंबई

नवी मुंबईत विभागवार दोन दिवस पाणी रहाणार बंद

CD

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने पाण्याची बचत व्हावी म्हणून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर पावसाळा लांबला तर पाण्याची अधिक टंचाई होऊ शकते. त्यामुळे पालिकेमार्फत आता शहरात विभागवार आठवड्यातील दोन दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन पाणी कपात सुरू केली आहे.
स्वतः च्या मालकीचे धरण असल्याने जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे. नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो. सध्या या धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्राची पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेता मोरबे धरणाच्या उपलब्ध साठ्यातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये या आधी विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करून पाणीकपात सुरू होती, मात्र धरणात आता अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस जर लांबला, तर पाण्याची टंचाई अधिक जाणवू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने पाणीकपातीत वाढ केली आहे. त्यामुळे ४ जून २०२४ पासून पुढील निर्णय येईपर्यंत सात विभागांत आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तसेच दिघा विभागात एमआयसीमार्फत पाणीपुरवठा होत असल्याने तेथील पाणीपुरवठा एमआयसीसीच्या शटडाऊननुसार बंद राहणार असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली आहे.


विभागवार बंद असणारा पाणीपुरवठा

१) सोमवार, गुरुवार - बेलापूर
२) मंगळवार, शनिवार - कोपरखैरणे
३) बुधवार, रविवार - घणसोली
४) गुरुवार, सोमवार - वाशी
५) शुक्रवार - ऐरोली (एक दिवस)
६) मंगळवार, शनिवार - नेरूळ
७) रविवार, बुधवार - तुर्भे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

SCROLL FOR NEXT