मुंबई

आनंद नगर पुलाचे काम कधी?

CD

आनंदनगर पुलाचे काम कधी?
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः मेट्रो रेल्‍वेची कामे पूर्ण झाल्‍यानंतर एमएमआरडीए प्राधिकरणाने गेल्‍या मे महिन्यात दहिसर, आनंदनगर येथील आविष्कार बिल्डिंगजवळील उड्डाणपुलाची तात्‍पुरती दुरुस्‍ती केली होती. पावसाळ्यात डांबर, खडी बाहेर आल्‍याने रस्‍ता खराब झाला आहे.
सध्या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपवण्यात आली आहे. प्रशासनाने वर्षभर दुर्लक्ष केल्‍यामुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत. आनंदनगर बाजूस पुलाच्या उताराकडे खड्डे पडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या पुलाच्या सखोल भागात कंबरेपर्यंत पाणी भरते. त्‍यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
यंदाच्या पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने आधी रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करावी. त्‍यानंतर रस्‍ता समतोल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडया यांनी केली आहे.
आनंदनगर वेल्‍फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमिन कर्णा यांनी सांगितले की, पावसाळा जवळ असूनही पालिकेकडून आनंद नगर परिसरातील समस्‍या सोडवलेल्‍या नाहीत. लवकरात लवकर कामे सुरू करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडया यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT