मुंबई

मतमोजणीमुळे कासा बाजारपेठ सामसूम

CD

कासा, ता. ४ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना कासा बाजारपेठेत सामसूम पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून कासा बाजारपेठेत दररोज कृषी केंद्रांवर भात, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांशी मोठी गर्दी होत होती; पण आज सकाळपासूनच फक्त कृषीविषयक बी-बियाण्यांची माहिती देणारे स्वयंसेवक फक्त दिसत होते. दररोज गर्दी होणाऱ्या वडापाव केंद्रावर सामसूम पाहायला मिळाली. ज्या बँकांमध्ये दररोज नागरिक पैसे देवाण-घेवाण करण्यासाठी गर्दी करत होते, त्यादेखील आज रिकाम्या दिसत होत्या. त्याचबरोबर दररोज गुळाचा चहा पिण्यासाठी मोठी गर्दी करणाऱ्या चहाच्या दुकानांतदेखील आज सकाळपासून सामसूम पाहायला मिळाली.

अनेक नागरिक मोबाईलवर निवडणूक निकाल पाहण्यात मग्न होते. पालघर लोकसभा निवडणूक कोण जिंकते, त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या जागा जास्त येतात, तसेच या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा आपली सत्ता राखतात की इंडिया आघाडीकडे सत्ता जाते, या उत्सुकतेने अनेक नागरिक आज घराबाहेर पडले नव्हते.

अनेक नागरिकांनी या निवडणुकीत उत्सुकता दाखवली होती. सर्वसाधारणपणे मतदानानंतर नागरिक आपल्या कामात व्यग्र असतात; पण यावर्षी निवडणुकीच्या निकालाकडे टपरीवाल्यांपासून अनेक व्यापारी वर्ग, तसेच सर्वसाधारण नागरिकांचेदेखील लक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

SCROLL FOR NEXT