मुंबई

ठाकरेंना संपवण्याच्या प्रयत्नात भाजपला फटका

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शिवसेना संपवण्यासाठी भाजपने शिंदे गटाला ताकद दिली, मात्र जिथे काँग्रेसविरोधात भाजपचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसैनिकांनी भाजपचा सुपडा साफ केला. ठाकरेंना संपवण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रात भाजप संपली अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे.

ठाण्यातील शिंदे गटाचा विजय हा धनशक्ती आणि भाजपच्या मोदी मतांवर मिळालेला आहे. शिवसेनेचे राजन विचारे हे एकाकी या धनशक्ती विरोधात लढले. उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्यासाठी भाजपने शिंदेंच्या पाठीमागे आपली सगळी ताकद उभी केली, मात्र भाजपच्या उमेदवारांना शिवसैनिकांनी नाकारले आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मुलुंडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा शिवसैनिकांनी पराभव करत शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांना दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे शिंदेंची ताकद भाजपच्या कामाला आली नाही. याचा दुसरा अर्थ शिंदेंची ताकद नाही, असाही होतो. महाराष्ट्रात शिंदेंचा कुठेही फायदा भाजपला झालेला दिसला नाही. उलट भाजपच्या जीवावर शिंदेंचे काही उमेदवार निवडून आले, असेही केदार दिघे यांनी म्हटले. तसेच पक्ष आणि चिन्ह चोरला असतानाही शून्यातून विश्व निर्माण करत नऊ जागांवर दणदणीत विजय संपादित केल्याबद्दल केदार दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT