मुंबई

सिगरेटने अडवली ‘सोलापूर वंदे भारत’ची वाट

CD

सिगारेटने अडवली ‘सोलापूर वंदे भारत’ची वाट
धूम्रपान करणाऱ्याला अटक; ट्रेनमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : धावत्या ‘सोलापूर वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाने धूम्रपान केल्यामुळे आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता, मात्र या प्रकरणी आरपीएफ पोलिसांनी धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक करून कारवाई केली आहे. या गोंधळामुळे ‘वंदे भारत’ ट्रेन काही काळ खोळंबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरवरून मुंबईसाठी सुटली. त्यानंतर ही मंकी हिल घाट परिसरात आली असताना सी-१ डब्यातील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाली. गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित डब्याकडे धाव घेतल्यानंतर डब्यात आग लागल्याची कोणतीही घटना घडल्याचे आढळून आले नाही. यावेळी आरपीएफ पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता, तेथील विकास पाठक हा प्रवासी डब्यात धूम्रपान करत असल्याचे आढळले. त्यामुळे वंदे भारत ट्रेनमधील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आरपीएफ पोलिसांनी दोषी प्रवाशाला कल्याण स्थानकात उतरवले. रेल्वे सुरक्षा दलाने त्याला अटक करून रेल्वे न्यायालयात हजार करण्यात आले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT