मुंबई

ओळखपत्राविना मतमोजणी केंद्रात प्रवेश

CD

पालघर, ता. ६ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी केंद्रात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचीही तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला, मात्र भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे समजल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच महायुतीचे काही नेते थेट मतमोजणी केंद्रामध्ये पाेहाेचल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विरोधकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर ते तातडीने बाहेर पडले होते. त्यांना बेकायदा प्रवेश दिल्याप्रकरणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.

४ जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीचा निकाल येण्यासाठी साडेनऊ वाजले, मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांच्या निकालामध्ये महायुतीचे उमेदवार आघाडी घेत असल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या विशिष्ट ओळखपत्राची आवश्यकता होती. या ओळखपत्र, तसेच मतमोजणी केंद्रात असणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती, मात्र सकाळी १०:३५ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री, महायुतीचे काही नेते आवश्यक ओळखपत्राविना थेट मतमोजणी केंद्रात शिरले होते.

विशेष म्हणजे मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता, मात्र पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री, त्यांच्यासोबत येणाऱ्या नेतेमंडळीकडे मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी ओळखपत्राची विचारणा केली नाही. याउलट मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यरत असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने पालकमंत्री यांना सलामी दिली, अशी माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेबद्दल दुजोरा दिला, मात्र आक्षेप घेणाऱ्याने लेखी तक्रार न दिल्याने या प्रकरणातील चौकशी व कारवाई प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्हीमध्ये कैद
मतमोजणीच्या ठिकाणी गेलेल्या पालकमंत्री यांच्यासोबत असणाऱ्या काही नेतेमंडळींकडे भ्रमणध्वनी असल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पालकमंत्री यांना मतमोजणी केंद्रात पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला. त्यावर संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : येवला बाजार समिती सहा दिवस बंद, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

SCROLL FOR NEXT