मुंबई

काँग्रेसच्या विजयात राहुल गांधी यांचा मोठा वाटा

CD

काँग्रेसच्या विजयात राहुल गांधी यांचा मोठा वाटा
नाना पटोले ः लोकसभेच्या विजयानंतर नाना पटोलेंची लाडूतुला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आणि देशभरातील वातावरण बदलले. या पदयात्रेत जनतेने सांगितलेल्या समस्या मांडल्या, त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला. त्यामुळेच जनतेने काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने राज्यात लोकसभेच्या १७ जागा लढवून १३ जागांवर यश मिळवले आहे. या मिळालेल्या विजयामुळेच काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडूतुला केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘भारतीय जनता पक्षाच्या तानाशाहीला जनता कंटाळली होती. लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत १० वर्षे अत्याचारी सरकार चालवल्यामुळेच जनतेने हा राग व्यक्त केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला एक जागा मिळाली होती, तर त्यानंतर आता २०२४ च्या निवडणुकीत १३ जागांवर मोठा विजय मिळाला आहे. या विजयात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत व परिश्रम यांचेही मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करून भाजपप्रणीत महायुती सरकारचा पराभव करेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.


MUM24E55100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

SCROLL FOR NEXT